SoMeThInG...Amazing....

SoMeThInG...Amazing....

27 February 2008

तुला खुप आवडतं ना गं,
दु:खी काव्य वाचायला,
कधीतरी शिकुन घे, तु
शब्दांमधला अर्थ उलगडायला,
मग बघ, तुला पण नाही जमायचं
डोळ्यांपासुन आसवांना अलग करायला .!!!...

!! आजपासुन ठरवलयं !!

आजपासुन ठरवलयं,
तुला कधीच नाही दुखवायचं,
वेड्या मनाला, पण सांगुन ठेवलयं,
की तु फ़क्त, मनातल्या - मनातच झुरायचं !
आजपासुन ठरवलयं,
तुला हसतानचं पहायचं,
आसवांनाही सांगुन ठेवलयं,
तुम्ही फ़क्त, डोळ्यातल्या - डोळ्यातचं वहायचं !!
आजपासुन ठरवलयं,
तुझंच बोलणं ऎकायचं,
वेडसर शब्दांनाही, सांगुन ठेवलयं,
तुम्ही सदा जिभेवरच रहायचं,
अन्‌ ओठांवर कधीच नाही यायचं !!!...
काहीएक गरज नाहीये,
तुझं, कोरडं सॉरी म्हणायची,
अगं मला सवयचं आहे, असं
एकटं -एकटं रहायची,
सुखाला दुरुनच पहायची, अन्
दु:खा ला निमुटपणे गिळायची !!!

!! बालपणात जायचयं !!

देवा मला परत बालपणात जायचयं,
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं......
पुरणाच्या पोळीसोबत,
आईचं प्रेम होतं,
जखमेचं माझ्या,
काळजावर तिच्या व्रणं होतं

देवा मला परत बालपणात
जायचयंआनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!१!!


शाळेत काही चुकलं तर्,
सरांची छडी होती,
’तिच्या’ समोर नाही मारलं,म्हणुन
मनात आनंदाची गुढी होती
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!२!!

चांदण एकटक पाहण्यासाठी,
निरभ्र मोकळं आकाश होतं,
अन्‌ भरपूर खेळण्यासाठी,
उजाडं असं रान्‌ होतं
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!३!!

बाबांच्या मारापुढे,
बत्ती माझी गुल होती,
अन्‌, आसू आईचे नकोत, म्हणुन
हास्यकळी माझी सदा फ़ुलत होती
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं
!!४!!


लहान भावाचं,
कायमच मागं राहणं,
अन् तो मागे का? म्हणून,
आईच मलाच दम देणं
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं
!!५!!


तेव्हा मला खरचं,
काही नाही कळायचं,
जसा छंदच मला,
विनाकारण भांडायच,
भांडलेल्या सर्वानाचं,
सॉरी म्हणुन यायचयं
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!६!!

मैत्रीण तेव्हाही एक ,
चांगली भेटली होती,
पक्की मैत्री होण्याआधीच ,
’ती’ कुठे बर हरवली होती,
एकदाच तिला फ़क्त, Hi म्हणुन
सरप्राईज द्यायचयं,
निखळ तिचं हसु,
डोळ्यात साठवून घ्यायचयं
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!७!!
------- संतोष....

26 February 2008

!! कटाक्ष !!

सोडून मज जाताना,
अंधारात तु ठेवू नकोस,
मागे वळून पाहताना,कटाक्ष
तुझा तो टाकू नकोस !
कदाचीत, तुझ्या मागे नसेनही मी,
पण, क्षीतीजापलीकडे,
तुझीच वाट पाहत असेन मी.!!...

25 February 2008

आठवण

अशाच एका कातरवेळी,
जेव्हा तुझी आठवण आली,
आठवण ती घालवण्यासाठी,
मी एक सिगारेट पेटवली,
पण, आठवण साली,
इतकी हट्टी झाली,कि धुरानेही,
तुझीच ’सुरत’ बनवली !!...

क्षण

तेव्हाही मला असचं,
कुणीतरी भेटलं होतं,
आपलसं करेल असं,
क्षणभर वाट्लं होतं !
पण, क्षणार्धात "ती"नं,
मला परकं म्हटलं होतं,
सगळचं "नाटक" माझ्या मनाला,
ऊशीरा उमजलं होतं.!!.....

23 February 2008

बोलणं माझं !!

तुझ्याशी बोलताना,
काय बोलावं ? तेच कळतं नाही,
काहीच जर बोललो नाही,तर..
मेंदू मनाला छळत राही..
म्हणूनच गं तुझ्याशी ,मी
कधीच काही, बोलत नाही...
वेड्या मनाला तुझ्या हे का गं,
कळत नाही ?..

22 February 2008

!! जादू !!

डोळ्यांतली जादू तुझ्या,
सदा अशीच राहू दे!
तुझ्या डोळ्यांत हरवणारा,
फ़क्त, मी एकटाच असु दे !!

21 February 2008

जर मोगय्राला बोलता आलं असतं !!!!!!!

किती बरं झालं असत,जर
मोगय्राला बोलता आलं असतं,
माळलेल्या गजय्रातुन, कानात तुझ्या
त्यानं माझं मन तरी ,
मोकळं केल असतं....

19 February 2008

ती

नेहमीच ती खळखळून हसायची,
अन हसणं झाल्यावर,
मुलखाचं लाजायची !
मुलखाचं लाजणारी अन,
खळखळून हसणारी "ती"
मला परत भेटेल काय ?

18 February 2008

"ती"

किती बरं शोधू तिला,
मला ती, परत भेटेल काय ?
हरवलेली खळी तीची,
दुसय्रा गालावर दिसेल काय ?

16 February 2008

कसे सांगू तिला ?
मला तिच्याशिवायआता करमत नाही,
तीच निघून गेल्यावर,
जीवनात शुन्याशिवाय काही उरत नाही....
कोण ?
माझी झोप राव !!!!!
एक सांग मला..
तुला इतकं कुणी गं दुखवलयं,
की तुझं तुलाच ऊमजेना,
तुझं मन कुठं बरं हरवलयं ?