आजही मला ते सर्व आठवतयं
जणू कालचं सारे घडल्यासारखं
तीच आयुष्याची मजा घेत
मित्रांच्या सहवासात बसल्यासारखं
अजुनही मला आठवतंय....
Lecture ला दांडी मारुन
बाजुचा परिसर फिरत बसायचो
फिरुन कंटाळा आला की
परत college कडे वळायचो
Canteen वाल्याला शिव्या घालत
बाहेरच्या café मध्ये जायचो
Café बंद असला की
परत Canteen मधलंच येऊन गिळायचो
Library card चा तसा कधी
उपयोग झालाच नाही
Canteen समोरच असल्याने Library कडे
पावलं कधी वळलीच नाहीत
आमच्या group ला मात्र
मुलींची तशी allergy होती
कदाचीत college कडून ती
आमच्या group ला झाली होती
चालु तासाला मागच्या
बाकावरAssignment copy करायचो
ज्याची copy केली आहे
त्याच्याआधीच जाउन submit करायचो
खुप आठवतात ते दिवस...
सोबत रडलेलो क्षण आठवले की
आज अगदी हसायला येतेपण
तेव्हा सोबत हसलेलो क्षण
आठवले की डोळ्यात चटकन् पाणि येतं.............
20 June 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
dolyat ure ata
themb aathvancha
Pudhe khitij fakt
mage pusat payvata
----by me
yr kavita is nice ha but i cant understand properly
Post a Comment