SoMeThInG...Amazing....

SoMeThInG...Amazing....

22 November 2007

सगळच कसं बदललयं ना ?

कालचीच माणसं आजही असताना ,
सगळच कसं बदललयं ना ?

आपलं अस वाटणारं कुणी
क्शणात परकं होतयं ,
अन मन माझ वेडं
कुणा परक्यालाच आपलं
बनवं म्हणतयं !!
सगळच कसं बदललयं ना ?

आई-बाच्या वेळी ,
सगळं कसं वेगळ होतं ,
नातं मैत्रीचं कुठं संपतय , अन
प्रेम कधी सुरु होतयं
हे तरी कळत होत ,
आता काय म्हणे , तर
मैत्रीतुनच प्रेम होतय ,
म्हणुनच कदाचीत मन माझ वेडं ..
मैत्रीच नको म्हणतयं !!
सगळच कसं बदललयं ना ?

तेव्हा खरचं बर होतं
माणुसकीतूनच नातं होत
आता ? ... माणुसकीचं मेल्यावर..
मन माझ वेडं, म्हणतयं
आई (माणुसकी) शिवाय कधी ,
कुणाला पोरं (नात) होत ? !!
सगळच कसं बदललयं ना ?

दुसय्रासाठी जगणारी माणसं खुप होती,
माणसालाच मारुन खाणारी,
माणूस-जनावरं मात्र नव्हती ..,
म्हणुनच कदाचीत
मन माझ वेडं ..
खाणंच नको म्हणतयं !!

कालचीच माणसं आजही असताना ,
सगळच कसं बदललयं ना ?