SoMeThInG...Amazing....

SoMeThInG...Amazing....

10 June 2009

तुजविण मी !!

सांग, मनी का वसतेस माझ्या,
अन छळुनी त्या तु, लुटतेस मजा,
एकट्याने पावसात भिजणेही,
आता वाटू लागले, मजला सजा !!
माझी न होताच जाणार तू,
लख्ख प्रकशीही, मग अंधारते,
ओलाचिंब मी असतानाही,
ह्र्दय अतृप्त का गं राहते ?
खोटेच हसणे,नकळत आसुंचेही येणे,
सोपेच मज आज वाटते,
विरहात तुझ्या, ऊमलते फ़ुलही..
मज निर्माल्य का गं भासते ?
मनी या तु असता, वादळ,
अन मनात तु नसता, वादळ,
ठाव मनाला,तू एक मृगजळ,
तरी ते तुजमागे , का गं धावते ?
.........................................S@ntosh

10 March 2009

खरं किती , खोटं किती !!

खरं किती , खोटं किती,
तुझं प्रेम, माझं किती ?

विरहाचं तुझ्या,
माझ्या डोळ्यात गं पाणी,
कशी सुचतात,सांग तुला,
तरी, आनंदाची गाणी !!

खरं किती , खोटं किती,
तुझं प्रेम, माझं किती ?

तुझ्या ओठावर हसु,
अन गालावर खळी,
इथं तीळ-तीळ तुटतं,
माझं काळीज गं राणी !!

खरं किती , खोटं किती,
तुझं प्रेम, माझं किती ?

’तु नाहीस माझी’, क्षणात वाटतं,
मनी मग प्रश्नांच,
एकच काहूर माजतं,
तुझं काळीज मजसाठी,
कधी हुंदका गं देतं ?

खरं किती , खोटं किती,
तुझं प्रेम, माझं किती ?

----- संतोष

18 December 2008

माझं ना ..!

माझं ना, तु सोबत असताना..
नेहमी असंच होतं..
तन तुजसवे, पण
मन थाय्रावर नसतं,
पौर्णिमेच्या रातीला,
सागराचं पाणी जसं,
चंद्र्माच्या भेटीला धावतं.!!.

माझं ना, तु सोबत असताना..
नेहमी असंच होतं..
सताड जागं असुनही,
जग दिसेनासं होणं,
तहानलेल्या हरणाचं, जसं
मृगजळामागचं पळणं..!!

माझं ना, तु सोबत असताना..
नेहमी असंच होतं..
एका मनाचं मुकं,
होऊन जाणं,
अन दुसय्राचं, त्याला डिवचणं,
वळवाच्या पावसाचं , जसं
ऋतुचक्रालाचं आव्हान देणं..!!

माझं ना, तु सोबत असताना..
नेहमी असंच होतं..
सारे विचार वेडे ठरवून,
मग, तेच मन..प्रेमधारांत माझ्या,
तुला मोरपीस फ़ुलवुन,
नाचताना पहायचयं म्हणतं..!!

माझं ना, तु सोबत असताना..
नेहमी असंच होतं..

नाही...

मनाला माझ्या, ’नाही’ ची,
सवयचं जुनी फ़ार,
प्रश्न एकच..
प्रश्न एकचं..की,
तुझ्या नकाराचा त्याला,
झेपेल काय बरं भार ..!!

13 September 2008

"बाप्पा ग्लोबल झालायं"...

काल गेलो मी, बाप्पाचा आशिर्वाद घ्यायला,
पहिल्यादांच पहात होतो, बाप्पाला विचारात पडलेला,
मी म्हटलं बाप्पा, काय बरं झालयं?
मन तुझं असं, कोणत्या विचारात पडलयं?

बाप्पानं मग मला, जवाब असा काही दिला,
कि हिंमत करुन मी,परत सवालच नाही केला..

काल येतानाच बघ, पुण्याच्या गर्दीला,
माझा उंदीर फ़ारच घाबरुन गेलेला..
मला म्हटला.. बाप्पा इथुनच जाऊ परत,
आपण आपल्या घरला..

ढोंगी माणसांची,गाह्राणी ऎकून,
इथं आता, माझा पण श्वास कोंडलाय,
मनानं तर माझ्या..
कधीच स्वर्गाचा रस्ता धरलायं..

असं काय करता बाप्पा..आमच्यासाठी तर..
तुम्ही ग्लोबल झालाय,बाप्पा ग्लोबल झालायं..

मंडळाच्या पोरांनी, बाप्पा तुझा...,
कधीच गुटखा-दारुवाल्यांना विकलायं,
माझ्यापेक्षा "त्या" पोस्टर चा आकारच १० पट झालायं..
काल रात्रीच,शेजारी माझ्या,
"कारभारी दमानं" गाण झालयं
अन..परंपरेच्या नावाखाली , पोरीला
आपय्रा कपड्यात नाचवलयं..

स्वातंत्र्यासाठी माझा, उत्सव सुरु झाला,
यांनी त्याचा, बघ कसा तमाशा केलायं...
अन.. तु म्हणतो बाप्पा ग्लोबल झालायं..
बाप्पा ग्लोबल झालायं ?

१० दिवस इकडे आल्यावर, मला कुण्या भक्तांन..
आई - बाबांशी बोलण्यासाठी, गेल्या वेळी १ मोबाईल दिला,
मी परत येइस्तोवर तर तुम्ही, त्याचा पण लिलाव केला,
एका नेता-भक्तान, नेत्याला "तो" भेट म्हणुन दिला,
त्यानं "तो" दान करुन ,स्टंट बघ कसा केला...
म्हातारा..बघ तो २ तासांपासून रांगेत ताटकाळलायं,
अन २ चं मिनीट झाले, १ खादीवाला माझं दर्शन घेऊन गेलायं,
तरी.. तु म्हणतो, बाप्पा ग्लोबल झालायं,
बाप्पा...ग्लोबल झालायं...

शेवटच्या दिवशी पण, उशीर होतो रे मला जायला..
पर्वाच नाही इथं, माझी कुणाला...
कारण यांना हवं असत, दारु डोसून मस्त झिंगायला..
विसरु नको पुढल्यावर्षी, दर्शनाचा माझ्या,
इंटरनेटवरुन अर्ज तु भरायला, नाहीतर..
आजएवढा पण नाही यायचा..बाप्पा तुझ्या वाट्याला..

माझ्या उत्सवाचा बघ रे, कसा बाजार मांडलाय...
तुझ्या बाप्पाच्या नावानं, यांनी धंदाच सुरु केलायं..
अन तु म्हणतो..बाप्पा ग्लोबल झालाय..
बाप्पा ग्लोबल झालाय...?

संतोष कुंडलीक....९९६००६८९४३

3 July 2008

कधी कधी !!!

कधी कधी मनात, बरच काही असुनही,
सत्यात ते कधीच येत नसतं,
अन कधी कधी, मनात काही नसतानाही,
बरच काही घडत असतं !!
पण, प्रत्येकवेळी मन बिचारं त्याचं,
फ़क्त तिच्यासाठीच झुरत असतं..

मनात त्याच्या असुनही,
तो तिला साद देत नाही,
अन त्याने, साद दिलीच नाही,
म्हणुन तीही प्रतिसाद देत नाही,..

साद
-प्रतिसादाच्या खेळातुन या,
कुणालाच काही मिळत नसतं,
पण, दोघांमधल प्रेम मात्र,
एकटच बिचारं रडत असतं .!!..

स्वप्नं पहाटेची म्हणे, सर्वांचीच
खरी होत असतात,
मग 'आपलीच' स्वप्नं अशी
धुळ खात का पडतात ?

पहाटेच सोडाच, रात्रं-दिन क्षणभरही,
डोळ्याआड तिचं, जाणं नसतं,
म्हणुनच कदाचीत,
डोळ्यांतल्या आसवांच,
मनाच्या उताराकडेच, धावणं असतं,
अन, बिचाय्रा मनाच्या नशीबी,
एकटक सगळं पहाणं असतं...

कधी कधी मनात, बरच काही असुनही,
सत्यात ते कधीच येत नसतं,
अन कधी कधी, मनात काही नसतानाही,
बरच काही घडत असतं !!
.............संतोष कुंडलीक

14 June 2008

प्रेम कधी असतं ?

प्रेम कधी असतं, तेच कळत नाही..
प्रेम कधी नसतं, तेही कळत नाही..

फ़ार बरं झालं असतं,
जर मनालाचं, बोलता आलं असतं,
अगर ओठांनी शब्दांना,
कधीच अडवलं नसतं,
मग मन माझं,
मोकळं होऊन बोललं असतं,
अन सुत तुझं-माझं,
एकदाचं जुळलं असतं !!

पण, प्रेम कधी असतं, तेच कळत नाही..
प्रेम कधी नसतं, तेही कळत नाही..!!


सगळेचं सांगतात मला,
एकदा डोळ्यांत बघ तिच्या,
म्हणे डोळ्यांत प्रेम दिसतं,
पण यांना कुणी सांगाव,
तु समोर आल्यावर,
डोळ्यांत तुझ्या पाहण्याचं,
धॆर्यच माझ्या...डोळ्यांत नसतं,
डोळ्यांत पाहिलही असतं ग मी,

पण काय सांगाव ..
डोळ्यांत, प्रेम नसलचं तर
अन असुनही,
जर मला ते नाही दिसलं तरं?

कारण, प्रेम कधी असतं, तेच कळत नाही..
प्रेम कधी नसतं, तेही कळत नाही..!!!!

25 April 2008

" मनाची काय काय ? "

ये काहीतरी विचारायचयं तुला, तु सांगशील ना मला ?
प्रेम म्हणजे काय ? हे तुला कधी कळेल काय ?

मला समोर पाहून, गालावर तुझ्या

गुलाबाची कळी, कधी फ़ुलेल काय ?

केसात माळलेल्या, मोगय्राला तुझ्या,

माझ्या प्रेमाचा गंध, कधी येईल काय ?

तुझ्या नील-नयनांना, माझ्या डोळ्यांतल
प्रेम कधी दिसेल काय ?

गुलाबी तुझ्या ओठांवर , माझ्याच

नावाचा जप, कधी असेल काय ?

काळजात मला तुझ्या, थोडा वेळ तरी
विसावा कधी मिळेल काय ?

मुक्या मनाचं माझ्या, तुझ्याच नावानं ओरडणं,
तुझ्या मनाला, कधी ऎकू येईल काय ?

अभ्यासाचं पुस्तक सोडून, माझं
लव्ह - लेटर वाचणं , तुला कधी झेपेल काय ?

पायांतल पैजण तुझं, फ़क्त
माझ्याच कानांसाठी, नाद कधी करेल काय ?

हे सगळं वाचुन तरी तुला,
मी आय लव्ह यु म्हणतोय, हे कधी उमजेल काय ?

**********Santosh************

26 March 2008

तु एकदाच फ़क्त, येऊन जा !!!!.

तुला इतकं का गं आवडतं,
मला छळायला,
स्वप्नात सारखं येऊन ,
झोपेचं माझ्या, खोबरं करायला...!
हे कधी कळायचं तुला,
मनही माझं थकलयं आता,
लाजणं तुझं पाहुन,
कायमच घायाळं व्हायला ...!!
मित्रानींही वेडं केलय,
सारखं तुझ्याबद्दल विचारुन मला,
मलाच "तु" कळत नाहीस, तर
त्यांना काय आहे, माझ्याकडे सांगायला ? ...!!!
तु एकदाच फ़क्त ,
येऊन जा,
जितकं छळायचं तितकं,
छळून जा,
एकट्या माझ्या मनाला,
तुझं मन देऊन जा,
"तु मला आवड्तोस",
एवढचं फ़क्त म्हणून जा,
भले वाटलं तुला तर,
माझी झोपही तुझ्याबरोबर,
घेऊन जा...
तु एकदाच फ़क्त,
येऊन जा !!!!.
.......................संतोष...

27 February 2008

तुला खुप आवडतं ना गं,
दु:खी काव्य वाचायला,
कधीतरी शिकुन घे, तु
शब्दांमधला अर्थ उलगडायला,
मग बघ, तुला पण नाही जमायचं
डोळ्यांपासुन आसवांना अलग करायला .!!!...