SoMeThInG...Amazing....

SoMeThInG...Amazing....

25 April 2008

" मनाची काय काय ? "

ये काहीतरी विचारायचयं तुला, तु सांगशील ना मला ?
प्रेम म्हणजे काय ? हे तुला कधी कळेल काय ?

मला समोर पाहून, गालावर तुझ्या

गुलाबाची कळी, कधी फ़ुलेल काय ?

केसात माळलेल्या, मोगय्राला तुझ्या,

माझ्या प्रेमाचा गंध, कधी येईल काय ?

तुझ्या नील-नयनांना, माझ्या डोळ्यांतल
प्रेम कधी दिसेल काय ?

गुलाबी तुझ्या ओठांवर , माझ्याच

नावाचा जप, कधी असेल काय ?

काळजात मला तुझ्या, थोडा वेळ तरी
विसावा कधी मिळेल काय ?

मुक्या मनाचं माझ्या, तुझ्याच नावानं ओरडणं,
तुझ्या मनाला, कधी ऎकू येईल काय ?

अभ्यासाचं पुस्तक सोडून, माझं
लव्ह - लेटर वाचणं , तुला कधी झेपेल काय ?

पायांतल पैजण तुझं, फ़क्त
माझ्याच कानांसाठी, नाद कधी करेल काय ?

हे सगळं वाचुन तरी तुला,
मी आय लव्ह यु म्हणतोय, हे कधी उमजेल काय ?

**********Santosh************

26 March 2008

तु एकदाच फ़क्त, येऊन जा !!!!.

तुला इतकं का गं आवडतं,
मला छळायला,
स्वप्नात सारखं येऊन ,
झोपेचं माझ्या, खोबरं करायला...!
हे कधी कळायचं तुला,
मनही माझं थकलयं आता,
लाजणं तुझं पाहुन,
कायमच घायाळं व्हायला ...!!
मित्रानींही वेडं केलय,
सारखं तुझ्याबद्दल विचारुन मला,
मलाच "तु" कळत नाहीस, तर
त्यांना काय आहे, माझ्याकडे सांगायला ? ...!!!
तु एकदाच फ़क्त ,
येऊन जा,
जितकं छळायचं तितकं,
छळून जा,
एकट्या माझ्या मनाला,
तुझं मन देऊन जा,
"तु मला आवड्तोस",
एवढचं फ़क्त म्हणून जा,
भले वाटलं तुला तर,
माझी झोपही तुझ्याबरोबर,
घेऊन जा...
तु एकदाच फ़क्त,
येऊन जा !!!!.
.......................संतोष...

27 February 2008

तुला खुप आवडतं ना गं,
दु:खी काव्य वाचायला,
कधीतरी शिकुन घे, तु
शब्दांमधला अर्थ उलगडायला,
मग बघ, तुला पण नाही जमायचं
डोळ्यांपासुन आसवांना अलग करायला .!!!...

!! आजपासुन ठरवलयं !!

आजपासुन ठरवलयं,
तुला कधीच नाही दुखवायचं,
वेड्या मनाला, पण सांगुन ठेवलयं,
की तु फ़क्त, मनातल्या - मनातच झुरायचं !
आजपासुन ठरवलयं,
तुला हसतानचं पहायचं,
आसवांनाही सांगुन ठेवलयं,
तुम्ही फ़क्त, डोळ्यातल्या - डोळ्यातचं वहायचं !!
आजपासुन ठरवलयं,
तुझंच बोलणं ऎकायचं,
वेडसर शब्दांनाही, सांगुन ठेवलयं,
तुम्ही सदा जिभेवरच रहायचं,
अन्‌ ओठांवर कधीच नाही यायचं !!!...
काहीएक गरज नाहीये,
तुझं, कोरडं सॉरी म्हणायची,
अगं मला सवयचं आहे, असं
एकटं -एकटं रहायची,
सुखाला दुरुनच पहायची, अन्
दु:खा ला निमुटपणे गिळायची !!!

!! बालपणात जायचयं !!

देवा मला परत बालपणात जायचयं,
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं......
पुरणाच्या पोळीसोबत,
आईचं प्रेम होतं,
जखमेचं माझ्या,
काळजावर तिच्या व्रणं होतं

देवा मला परत बालपणात
जायचयंआनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!१!!


शाळेत काही चुकलं तर्,
सरांची छडी होती,
’तिच्या’ समोर नाही मारलं,म्हणुन
मनात आनंदाची गुढी होती
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!२!!

चांदण एकटक पाहण्यासाठी,
निरभ्र मोकळं आकाश होतं,
अन्‌ भरपूर खेळण्यासाठी,
उजाडं असं रान्‌ होतं
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!३!!

बाबांच्या मारापुढे,
बत्ती माझी गुल होती,
अन्‌, आसू आईचे नकोत, म्हणुन
हास्यकळी माझी सदा फ़ुलत होती
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं
!!४!!


लहान भावाचं,
कायमच मागं राहणं,
अन् तो मागे का? म्हणून,
आईच मलाच दम देणं
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं
!!५!!


तेव्हा मला खरचं,
काही नाही कळायचं,
जसा छंदच मला,
विनाकारण भांडायच,
भांडलेल्या सर्वानाचं,
सॉरी म्हणुन यायचयं
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!६!!

मैत्रीण तेव्हाही एक ,
चांगली भेटली होती,
पक्की मैत्री होण्याआधीच ,
’ती’ कुठे बर हरवली होती,
एकदाच तिला फ़क्त, Hi म्हणुन
सरप्राईज द्यायचयं,
निखळ तिचं हसु,
डोळ्यात साठवून घ्यायचयं
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!७!!
------- संतोष....

26 February 2008

!! कटाक्ष !!

सोडून मज जाताना,
अंधारात तु ठेवू नकोस,
मागे वळून पाहताना,कटाक्ष
तुझा तो टाकू नकोस !
कदाचीत, तुझ्या मागे नसेनही मी,
पण, क्षीतीजापलीकडे,
तुझीच वाट पाहत असेन मी.!!...

25 February 2008

आठवण

अशाच एका कातरवेळी,
जेव्हा तुझी आठवण आली,
आठवण ती घालवण्यासाठी,
मी एक सिगारेट पेटवली,
पण, आठवण साली,
इतकी हट्टी झाली,कि धुरानेही,
तुझीच ’सुरत’ बनवली !!...

क्षण

तेव्हाही मला असचं,
कुणीतरी भेटलं होतं,
आपलसं करेल असं,
क्षणभर वाट्लं होतं !
पण, क्षणार्धात "ती"नं,
मला परकं म्हटलं होतं,
सगळचं "नाटक" माझ्या मनाला,
ऊशीरा उमजलं होतं.!!.....

23 February 2008

बोलणं माझं !!

तुझ्याशी बोलताना,
काय बोलावं ? तेच कळतं नाही,
काहीच जर बोललो नाही,तर..
मेंदू मनाला छळत राही..
म्हणूनच गं तुझ्याशी ,मी
कधीच काही, बोलत नाही...
वेड्या मनाला तुझ्या हे का गं,
कळत नाही ?..